Maharashtra Politics Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सत्तासंघर्षाचा तिढा आज सूटणार, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे होणार थेट प्रक्षेपण

Supreme Court live Streaming: देशाच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल असून जनतेला आता घरबसल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा (Maharashtra Politics) तिढा सूडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीचे लाइव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. देशाच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय असून नागरिकांना आता घरबसल्या सुनावणी पाहता येणार आहे. हे लाइव्ह स्ट्रिमिंग १०:30 ला सुरू होणार आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी आहे. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे, त्याबाबत आज सुनावणी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण, महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष तसेच दिल्ली विरुद्ध केंद्र सरकार यांच्यातील सुनावण्यांचा समावेश आहे. आज संपुर्ण महाराष्ट्राचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी आहे. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मोठा निर्णय देण्याची शक्यता आहे. या सुनावणीच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील प्रकरण दुसऱ्या क्रमाकांवर आहे. 7 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असायला हवी, याबाबत 2018 साली सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकाकर्त्यांमध्ये ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांचाही समावेश होता. यानंतर मार्च 2018 मध्ये न्यायालयाने भारताचे अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांना पत्र लिहून संबंधित याचिकेवर त्यांचे मत मागवले होते. यावर चाचणी म्हणून घटनापीठांसमोरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची शिफारस वेणुगोपाल यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT