PFI Viral Video: पुण्यातील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा व्हिडिओ फेक, Alt News चा दावा

अशा घोषणा न दिल्याचे पुणे पोलिसांचे देखील स्पष्टीकरण
PFI Viral Video
PFI Viral VideoDainik Gomantak

केंद्रीय यंत्राणांनी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India) देशभरातील विविध कार्यालयांवर धाडी टाकत अनेक हस्तकांना ताब्यात घेतले. या कारवाई विरोधात पुण्यात 24 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पीएफआयच्या काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर अनेक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. दरम्यान, हा व्हिडिओ खरा असला तरी त्यात देण्यात आलेली पाकिस्तान जिंदाबाद ही घोषणा खोटी असल्याचा दावा फॅक्ट चेक करणाऱ्या अल्ट न्यूज या वेबसाईटने केला आहे.

PFI Viral Video
Pune: 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणेवरून राज ठाकरे आक्रामक, म्हणाले 'ही कीड समूळ नष्टच करा'

देशभरात ईडी आणि एनआयए या संस्थांनी पीएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली. याचाच निषेध म्हणून पीएफआय कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केले. यावेळी पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला व सर्वांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी देखील याबाबत एक पत्र लिहले आपल्या भावना व्यक्त केल्या. 'देशद्रोह्यांचे समर्थन करत पीएफआय कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही धेरं आमच्या देशात चालणार नाहीत. ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. असेही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले.

PFI Viral Video
Navratri Special: मुख्यमंत्र्यांकडून महिलांसाठी महत्वाची घोषणा; "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियानाला सुरूवात

अल्ट न्यूजने काय म्हटलं आहे.

अल्ट न्यूजने व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी या संबधित विविध व्हिडिओ तपासले. पुण्यात पीएफआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या अनेक व्हिडिओत आंदोलन सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तपासले. यामध्ये आंदोलकांनी कधी बीजेपी मुर्दाबाद, पॉप्यूलर फ्रंट जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. पण त्या पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा केल्याचा विविध न्यूज चॅनलने दावा केला. पण, आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद नव्हे तर पॉप्यूलर फ्रंट जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचे दिसून येते असे अल्ट न्यूजने म्हटले आहे.

PFI Viral Video
Goa Crime : अपहरण करत पैसे लुटल्याचा गंभीर आरोप; दोघे अटकेत

पुणे पोलिसांनीही दिले स्पष्टीकरण

पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी देखील या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यातील पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात कुणीही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या नाहीत. व्हायरल व्हिडिओत जो दावा करण्यात येत आहे, तो खोटा आहे. आंदोलक पीएफआय जिंदाबाद आणि पॉप्युलर फ्रंट जिंदाबाद अशा घोषणा देत होते. त्यात पाकिस्तानचा कुठेही उल्लेख नव्हता. आंदोलनात कुणीही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या नाहीत. जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो सपशेल खोटा असल्याचं स्पष्टीकरण बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com