deepak kesarkar Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना विनंती करुन ही ते ऐकण्यास तयार नव्हते; आता वेळ गेली - दिपक केसरकर

राष्ट्रवादी आणि भाजप सोबतची युती तोडूयात सांगितले पण मुख्यमंत्र्यांनी ऐकलेच नाही

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांनी बंडखोरी करत आसाम गाठले. यानंतर शिवसेनेच्या गोटात सुरु असलेली अंतर्गत झुसफूस चव्हाट्यावर आल्याचे संपुर्ण महाराष्ट्र गेले काही दिवस पाहतो आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ता आणि शिवसेना आमदार दिपक केसरकर यांच्याशी गोमन्तक प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण वारंवार विनंती केली पण ते ऐकण्यास तयार नव्हते, आता वेळ गेली असे तेे म्हणाले. (Maharashtra political crisis; Now the time is gone; Nothing can happen now - Deepak Kesarkar )

केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, आपण राष्ट्रवादी आणि भाजप सोबतची युती तोडूयात सांगितले. आम्ही आमची भुमिका ऐका अशी विनंती केली. मात्र ते ऐकायला तयारच नाहीत. आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की, आम्ही 28 तारखेपर्यंत फार फार तर थांबू मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामूळे त्य़ानंतर शिवसेना नेत्यांनी आता या आघाडीविरोधात जाण्यासाठी आपली शक्ती एकवटली आहे.

तसेच शिंदे गटाने सर्वाच्च न्यायालयात घेतलेल्या भुमिकेप्रमाणे महाविकास आघाडीसरकारचा पाठींबा आमच्या सोबत असणाऱ्या सर्व आमदारांनी काडून घेण्याचं ठरवले आहे. आणि त्या प्रमाणे आम्ही राज्यपालांच्या सुचनेनूसार विधानभवनात मतदान ही करणार आहोत असे ही ते यावेळी म्हणाले.

ती वेळ आता निघून गेली; आता काही होऊ शकणार नाही

आम्ही ठाकरे यांना वारंवार विनंती केली होती की, आपण ही युती तो़डूयात आम्हा प्रतिनिधींचे मत विचारात घ्या. मात्र त्यांनी ते ऐकले नाही. त्यांच्या मनात असते तर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलू शकले असते. मात्र तसे त्यांनी काही केले नाही. उलट ते आपल्या मतावर ठाम राहीले. ते भाजपसोबत युती करु शकले असते. बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे. ती इच्छा ही पुर्ण होऊ शकली असती. त्या प्रमाणे एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्री करु शकतो मात्र उद्धव ठाकरे यांनी असं केलं नाही. त्यामूळे आम्ही आता पुढचा निर्णय घेणार आहोत, असे ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT