'चूक झाली तर माफ करा', कॅबिनेट मीटिंगमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भावनिक साद

राजकीय गदारोळात महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळात महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वांचे आभार मानले आणि अडीच वर्षांत चूक झाली असेल तर क्षमा करा, असे वक्तव्य केले. तुमच्या अडीच वर्षांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञ असल्याचे म्हणत त्यांनी मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांवरही प्रतिक्रिया दिली. आपल्याच लोकांनी घात केला, मला दगा दिला, म्हणत ठाकरे यांनी भावनिक साद घातली.

Uddhav Thackeray
16 आमदार अपात्र ठरले तर महाविकास आघाडीचे सरकार वाचणार का?

या बैठकीनंतर महाराष्ट्र सरकारचे मंत्री जयंत पाटील म्हणाले की, 'आज 29 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या तिन्ही पक्षांनी अडीच वर्षात केलेल्या चांगल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उद्या सुप्रीम कोर्टाने विश्वासदर्शक ठराव होईल असे सांगितले तर ही बैठक शेवटची आहे की नाही हे ठरेल.'

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी या मंत्रिमंडळ बैठकीबाबत सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही खूप चांगले सहकार्य करता आणि भविष्यातही असेच सहकार्य अपेक्षित आहे आणि मी तुम्हाला अशीच वागणूक देत राहीन.'

Uddhav Thackeray
मोठी बातमी! औरंगाबाद शहराचे नामांतर 'संभाजीनगर', ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने आपल्या मंत्रिमंडळात औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहराचे नाव बदलून 'धाराशिव' असे करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkan to Akkalkot ST Bus Service
Maharashtra Family Suicide Case
Mumbai Sawantwadi Express Daily Train
Bhiwandi Building Collapse
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com