महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. यातच आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामातंर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने औरंगाबादचे 'संभाजी नगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामांतर करण्यास मंजूरी दिली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलून 'डी. बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी औरंगाबादचे नामांतर 'संभाजीनगर' करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. मंगळवार, 28 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते म्हणाले की, ''आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मी औरंगाबाद शहराचे नामांतर 'संभाजीनगर' करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्याता देण्यात आली आहे.''
तसेच, हिंदुत्वाच्या मूळ विचारसरणीशी तडजोड केल्याचा आरोप शिवसेनेवर (Shiv Sena) होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील शहरांचे नामांतर करण्यावरुन भाजप (BJP) महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार निशाणा साधत होते. आपल्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे मोठे निर्णय घेतले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.