Poladpur Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात 4 विद्यार्थांचा मृत्यू

Poladpur Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्यात भीषण अपघात झाला. यात रिक्षामधील एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.

  • परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघातात दुदैवी मृत्यु

पोलादपूर तालुक्याजवळ कशेडी घाटामध्ये काल रिक्षा व डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातात एकूण 4 जणंचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. पोलादपूर खेड येथून माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे परतत असताना रिक्षेचा अपघात झाला.

खेड येथे परीक्षेसाठी जात असलेल्या गोरेगाव येथील विद्यार्थ्यांचा या अपघातात दुदैवी अंत झाला आहे. या अपघातात तीन मुली आणि एक रिक्षाचालक ठार झाला आहे. वाळूने भरलेला डंपर या रिक्षावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे कळत आहे, हालीमा अब्दुल सलाम पोपेरे, (23 वर्षे, नांदवी),  आसिया सिद्दीक  (20 वर्षे, गोरेगाव), नाजमीन मूफीद करबेलकर (22 वर्षे, सवाद) अमन उमर बहुर (46 वर्षे, गोरेगाव) यांचा मृत्यू झाला आहे. 

  • अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प 
    काल संध्याकाळी 7 च्या दरम्यान मुंबई- गोवा (Mumbai-Goa) महामार्गावरील कशेडी घाटात वाळूने भरलेला डंपर काल पलटी झाला. वाळूच्या ढिगाऱ्याखाली एक रिक्षा अडकली. रिक्षातील प्रवासी आणि चालक देखील वाळूच्या ढिगाऱ्याखाली अडकले. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

    रिक्षातील एका व्यक्तीचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आला असून वाळूचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू होते. या रिक्षामध्ये चालक आणि तीन प्रवासी मुली होत्या. रिक्षावर डंपरमधली संपूर्ण वाळू पडल्याचे रिक्षातील चारही जाणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परंतु, पोलिसांनी आणि स्थानिकांनी वाळू बाजूला करून काही वेळानंतर ही वाहतूक सुरळीत केली.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT