SalamAir Emergency Landing Dainik Gomantak
महाराष्ट्र

SalamAir Emergency Landing: बांगलादेशहून मस्कतला जाणाऱ्या ओमान विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

बांगलादेशहून मस्कतला जाणाऱ्या ओमानच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

बांग्लादेशहून मस्कतला जाणाऱ्या ओमानच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानातील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.
(SalamAir Emergency Landing Emergency Landing at Nagpur Airport)

ओमानच्या सलाम एअरलाईन्स हे विमान आज बांगलादेशच्या चाट्टोग्राम येथून मस्कत येथे जात होते. विमानाने उड्डाण घेतल्यावर अचानक या विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याने हे विमान तातडीने नागपूर विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले.

अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीनमुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या विमानाचे सुखरूप लॅंडींग करण्यात आले आहे. या विमानातील सर्व प्रवासी हे सुखरुप आहेत. या विमानात सुमारे 200 प्रवासी तर सात क्रू मेंबर्स होते. सध्या या विमानांची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान बांगलादेशातील चातगाव येथून निघाले होते. विमान हे भारतीय (India) हद्दीत असतांना अचानक विमानाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे समजताच पायलटने हे विमान नागपूर विमान तळाच्या दिशेनं वळवत या विमानाची सुरक्षित इमर्जन्सी लँडीग येथील विमानतळावर करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT