Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

Panaji Protest Detention: मेगा प्रकल्पाविरोधात गेल्या ७५ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कारापूर-सर्वणच्या ग्रामस्थांनी क्रांतिदिनी पणजीत आंदोलन केले.
Karapur Mega Project Protest
Karapur Mega Project ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मेगा प्रकल्पाविरोधात गेल्या ७५ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कारापूर-सर्वणच्या ग्रामस्थांनी क्रांतिदिनी पणजीत आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले खरे, पण विरोधकांच्या दबावामुळे कोणताही गुन्हा न नोंदविता त्यांना सोडण्यात आले.

सायंकाळी आंदोलकांनी पुन्हा पणजीत येऊन आझाद मैदानातील हुतात्मा स्मारकास अभिवादन केले आणि गाऱ्हाणे घालून गाव अबाधित राखण्याचा निर्धार केला. मेगा प्रकल्पाविरोधात विविध खात्याच्या संचालकांना निवेदने देऊनही दखल घेतलेली नाही.

सरकारला देण्यासाठी जमविले पैसे!

राज्य सरकार विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प गावांवर लादत आहे. मोठ्या प्रमाणात जमिनींचे रूपांतर करून परराज्यातील विकसकांना त्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे स्थानिकांच्या जमिनी दुसऱ्यांच्या घशात जात आहेत. त्यातून सरकारला पैसा मिळतो. तो पैसा आम्ही देतो, असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी पैसे गोळा केले आणि ते मोर्चा अडविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला.

Karapur Mega Project Protest
Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

मेगा प्रकल्‍प विरोधात गेली ७५ दिवस आंदोलन करणाऱ्या कारापूरवासीयांनी आज क्रांतिदिनी पणजीत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आंदोलनकर्ते आज सकाळी नऊच्या सुमारास पणजीत धडकले. मात्र, आझाद मैदानाकडे येणारे सर्व मार्ग पोलिसांनी अडविले.

आझाद मैदानाकडे ये-जा करणाऱ्यांकडे विचारणा करूनच सोडले जात होते. त्यातूनही वाट काढत आंदोलनकर्ते शहर पोलिस स्थानकाकडून एमजी मार्गावरून आझाद मैदानाकडे येत असताना पोलिसांनी त्यांना अडविल्याने आंदोलनकर्त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या मारला आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

आंदोलनकर्त्यांना जुने गोवे पोलिस ठाण्यात नेल्याचे समजल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारचा निषेध केला. आज क्रांतिदिन असतानाही सरकार सालाझारशाहीप्रमाणे वागत असल्याची टीका त्यांनी केली.

त्यानंतर आंदोलनकर्त्यांना का ताब्यात घेतले, असा जाब विचारण्यासाठी आमदार विजय सरदेसाई, आमदार वीरेश बोरकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, हेमा सरदेसाई, दीपक कळंगुटकर, दुर्गादास कामत, रामा काणकोणकर, मनीषा उसगावकर आदी त्याठिकाणी पोहोचले आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांना जाब विचारला.

Karapur Mega Project Protest
Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

गुपचूप काढता पाय...

आंदोलन सुरू असताना लोकांना ताब्यात घेण्याची सूचना देणाऱ्या मामलेदार संजीवनी सातार्डेकर यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. कोणत्या कलमाखाली आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, असा सवाल त्यांना पत्रकारांनी केला. त्यांनी मोबाईल काढून अशा घटनेत कोणती कलमे लागतात, हे ‘गुगल’वर तपासण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पत्रकारांनी ‘गुगलवर कलमे पाहताय काय? असा सवाल केला.

मामलेदार संजीवनी सातार्डेकर यांनी पत्रकारांचे प्रश्न ऐकून घेत त्या ठिकाणाहून गुपचूप काढता पाय घेतला. तरी पत्रकारांनी त्यांचा पाठलाग करणे थांबविले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना त्यांनी ‘गुगल’वर कलमे तपासल्यावर पत्रकारांनी त्यांच्यावर पुन्हा प्रश्नांचा भडिमार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com