Maharashtra: Marathi language subject in all school now compulsory 
महाराष्ट्र

राज्यातील शाळांत आता मराठी विषय सक्तीचा,सरकारचा आदेश जारी

राज्यातील केंद्रीय बोर्डांच्या (CBSE) शाळांमध्ये मराठी विषय (Marathi Language Subject) शिकविणे आता अनिवार्य असणारआहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील केंद्रीय बोर्डांच्या (CBSE) शाळांमध्ये मराठी विषय (Marathi Language Subject) शिकविणे आता अनिवार्य असणारआहे. याबाबतचा निर्णय देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने (Educational Department) एक जीआर काढला आहे. त्यामुळे सरकारच्या नव्या निर्देशानुसार आता सीबीएसई (CBSE), आयसीएसई, आयबी(IB), केंब्रिज(Cambridge) आणि इतर मंडळांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठी विषय यापुढे शिकवावाच लागणार आहे. (Maharashtra: Marathi language subject in all school now compulsory)

याअगोदर याबाबतची सूचना देऊनही त्यावर अंमलबजावणी होत नव्हती. आता मराठी भाषा विभागासोबत शालेय शिक्षण विभागानेही सोमवारी याबाबतचा जीआर जारी केला आहे. प्रत्येक शाळांमध्ये मराठी भाषा विषय हा सक्तीने शिकविण्याचे निर्देश या जीआरमधून देण्यात आले असून या जीआरचे उल्लंघन करणाऱ्या शाळेला तसेच संबंधित व्यक्तीला एक लाखाचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

या जीआरच्या माध्यमातून अनेक केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी बोलण्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोणतेही निर्बंध लादता येणार नाहीत त्याचबरोबर मराठी भाषा बोलण्यावर निर्बंध आणणारा कोणताही फलक किंवा सूचना देता येणार नाहीत असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत .शासनाच्या या नवीन आदेशानुसार इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय आता अनिवार्य असणार आहे.

सरकारने गेल्या वर्षी सुद्धा एक निर्णय काढत सरकारी आणि खासगी शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवावा, असा आदेश काढला होता. पण त्या आदेशात मराठी हा विषय सक्तीचा असावा असा उल्लेख नसल्याने काही शाळांनी मराठी या विषयाला द्वितीय भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्यातील अनेक शाळेत मराठी भाषा शिकवण्याचा सरकारचा निर्णय योग्यपद्धतीने राबवला जात नव्हता. आणि याच कारणांमुळे आता राज्य सरकारने नवा जीआर जारी काढून हा आदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT