महाराष्ट्रात (Maharashtra) रविवारी कोरोना विषाणूच्या (Covid19) संसर्गाची 4,666 नवीन रुग्ण समोर आल्याने राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 64,56,939 वर पोहोचली आहे. तर कोविड-19 च्या 131 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या वाढून 1,37,157 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आरोग्य विभागाने सांगितले की, गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील 3,510 रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यांच्यासह राज्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 62,63,416 एवढी झाली आहे. राज्यात कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के एवढा आहे तर कोरोना संक्रमणाचा दर 2.12 टक्के आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत 52,844 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे रविवारी राज्यातील जालना, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि परभणीमध्ये कोविड-19 चा एकही रुग्ण आढळला नाही. तर विदर्भातील नागपूर आणि अकोला विभागात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
दरम्यान, मुंबईत कोरोना विषाणूची 845 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि दिवसभरात 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत शहरात या आजाराची 16,62,394 प्रकरणे नोंदली गेली असून, त्यापैकी 34,976 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.