RT-PCR चाचणीवरून महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद Dainik Gomantak
महाराष्ट्र

RT-PCR चाचणीवरून महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद

कोविड निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सक्तीवरून दोन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा खंडित झाली असून दोन्ही राज्यांची बसवाहतूक सध्या सीमेपर्यंतच सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

कोविड निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र (RT-PCR) सक्तीवरून दोन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) बस सेवा (Bus Service) खंडित झाली असून दोन्ही राज्यांची बसवाहतूक सध्या सीमेपर्यंतच (State Border) सुरू आहे. कर्नाटक राज्यात कोविड चाचणी प्रमाणपत्राची सक्ती आणि महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सुट दिल्यामुळे काही प्रवाशांनी कर्नाटक परिवहन विभागाच्या बसेस मिरज स्थानकावर रोखल्याने कर्नाटकने बस वाहतूक थांबवण्याचा विर्णय घेतला आहे. कोरोना रूग्णसंख्येचा विचार केला तर सांगली, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आघाडीवर असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशाकडे कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. Maharashtra-Karnataka bus service closed due to RT-PCR test()

या उलट कर्नाटकातून सांगली आणि मिरजे मध्ये येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही केली जात नाही तर ही सक्ती कशासाठी, असा प्रश्न उभा करत दोन दिवसांपूर्वी मिरज बस स्थानकावर कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या बसेस थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकने आपल्या बसेस केवळ म्हैसाळ सीमेपर्यंतच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बसेसही फक्त कर्नाटकच्या सीमेपर्यंतच धावत आहेत. बस सेवा खंडित झाल्याने कोविड प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांचीही गैरसोय होतांना दिसत आहे. सीमाभागातून अन्य गावी जाणाऱ्या प्रवाशांना सीमेपर्यंत जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी सक्ती करण्याच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात आंदोलन केल्यानंतर आज शिवसेनेने याच मागणीसाठी निदर्शने केली होती. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथे महाराष्ट्र राज्याचा शेवटचा टोल नाका आहे. तेथून पुढे काही अंतरावर कर्नाटक राज्यातील कोगनोळी या गावात पहिला टोल नाका सुरू होतो. कर्नाटकात कोरोना संसर्ग वाढू नये याची दक्षता म्हणून राज्य शासनाने राज्यात प्रवेश करणार्‍यांसाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल सक्तीचा केला आहे. मात्र ही सक्ती कोल्हापूर जिल्हा अंतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी अडचणीची ठरतांना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT