चंद्रकांत पाटील पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला; युतीच्या चर्चेला उधाण

मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं राजकीय दृष्ट्या महत्वाचे असते.
Raj Thackeray and Chandrakant Patil
Raj Thackeray and Chandrakant PatilDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी (Elections) अनेक प्रकारची राजकीय (Politics) समीकरणेही बदलण्याची अपेक्षा आहे. विरोधी भाजप सातत्याने सत्ताधारी महा विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, भाजपचे महाराष्ट्रचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुन्हा एकदा भेट घेतली आहे. पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. (Chandrakant Patil met Raj Thackeray)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही

इतर मागासवर्गीयांच्या (OBC) आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत भाजप राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी देणार नाही. स्थानिक संस्थांमध्ये ओबीसींसाठी आरक्षण 50 पेक्षा जास्त असू शकत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Raj Thackeray and Chandrakant Patil
महाराष्ट्रात प्रवेश करण्यापुर्वी जाणुन घ्या काय आहेत नियम व अटी

भाजप-मनसे युतीच काय?

भाजप-मनसे युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर असेही सांगितले जात आहे की, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपाला मान्य नाही. मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे शक्यता दिसत आहे. मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला कदापी मान्य नाही. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं राजकीय दृष्ट्या महत्वाचे असते. म्हणून मी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Raj Thackeray and Chandrakant Patil
गणपती स्पेशल ट्रेन: कोकणासाठी 150 ज्यादा गाड्या

महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याने या भेटीबाबत अनेक कयास काढले जात आहेत. भविष्यकालात मनसे भाजपसोबत युती करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com