Maharashtra-Karnataka border dispute Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, सीमाभागातील 865 गावांना करणार आर्थिक मदत

सांगली जिल्ह्यातील 40 गावांनी केलेल्या ठरावाचा कर्नाटक गांभीर्याने विचार करत असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते.

Pramod Yadav

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे. सांगली जिल्ह्यातील 40 गावांनी केलेल्या ठरावाचा कर्नाटक गांभीर्याने विचार करत असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. यावर आता महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकाने मोठा निर्णय घेतला आह. सीमाभागातील 865 गावांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही असे म्हटले होते.

(Maharashtra-Karnataka border dispute)

सीमाभागातील बेळगावसह 865 गावांतील संस्था आणि संघटनांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक, निम सार्वजनिक संस्था आणि संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधिचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे 2023-24 सालासाठी 10 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

दरम्यान, सांगलीच्या जत तालुक्यातील 40 गावांनी केलेला ठराव फार जुना असल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही. उलट बेळगावसह इतर गावे महाराष्ट्रात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे फडणवीस म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT