Farmers Financial Relief Dainik Gomantak
महाराष्ट्र

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Maharashtra Government Interim Relief For Farmers: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 5000 रुपयांची मदत जमा केली जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Manish Jadhav

Drought-Hit Farmers to Receive ₹5,000 Before Diwali: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच दिलासादायक बातमी समोर आली. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 5000 रुपयांची मदत जमा केली जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून ही मदत देण्याचा निर्णय घेतला.

या मदतीमागील मुख्य कारण म्हणजे यंदा महाराष्ट्रात पावसाने हुलकावणी दिली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात केवळ 80 टक्केच पाऊस झाला असून, सोलापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये तर 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. स्थिती इतकी बिकट झाली आहे की, सरकारला 34 जिल्ह्यांमधील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा लागला. याचाच अर्थ राज्याचा 75 टक्के भाग दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे विभागाला या दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरमध्येच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले होते.

फक्त 5 हजार रुपयांची आर्थिक मदतच नाही, तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmers) इतरही अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पीक कर्ज वसुलीवर पूर्ण स्थगिती, वीज बिलात सवलत, पीक कर्जाचे नवीन स्ट्रक्चर करुन व्याजात दिलासा, शालेय फीमध्ये सवलत आणि पीक नुकसानीसाठी स्वतंत्र भरपाई यांचा समावेश आहे.

दिवाळीपूर्वी केंद्राकडून मदत मिळण्याची शक्यता नसल्याने राज्य सरकारने ही तात्काळ मदत देण्याचे ठरवले. जर भविष्यात केंद्राकडून निधी मिळाला, तर आणखी मदत दिली जाईल. जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल, तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक ठेवा, जेणेकरुन ही रक्कम थेट डीबीटीद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

Ranji Trophy 2026: पिठिया, भार्गवच्या फिरकीचा गोव्याला फटका! बडोद्याने फॉलोऑन लादला; पराभवाची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT