Maharashtra government new scheme Mission Kavach Kundal for vaccination drive  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचं 'मिशन कवच कुंडल',लसीकरणासाठी मोठं पाऊल

राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाला (Vaccination) गती देण्यासाठी 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान मिशन कवच कुंडल राबविण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील कोविड (COVID-19) प्रतिबंधक लसीकरणाला (Vaccination) गती देण्यासाठी 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान मिशन कवच कुंडल (Mission Kavach Kundal) राबविण्यात येणार आहे.अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे त्याचबरोबर या अभियानात राज्यात दररोज 15 लाखाहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे देखील आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे. (Maharashtra government new scheme Mission Kavach Kundal for vaccination drive)

राज्यात अभियानासाठी पुरेशी लस उपलब्ध असून सध्या आपल्याकडे 75 लाख लस आहेत. त्यातच राज्याला आणखीन 25 लाख लसी मिळणार आहेत

राज्यात आतापर्यंत सहा कोटी लोकांचे लसीकरण झाले असून, सव्वातीन कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण शिल्लक असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे.

तसेच न्यायालायने दिलेल्या आदेशानुसार राज्यात कोविडमुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे सुमारे 1 लाख 40 हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी ‘एसडीआरएफ’मधून सुमारे 700 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल.असे सप्ष्टीकरण देखील त्यांनी दिले आहे.

सध्या राज्याच्या लसीकरणाची स्थिती पाहता पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 65 टक्के आहे. लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मत यावेळी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

SCROLL FOR NEXT