Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra Fadnavis  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra सरकारची मोठी घोषणा! कोरोनाकाळातील सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) अंतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात (Corona Virus) घडलेल्या राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना मात्र कोणताही दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हास्तरावर गठीत केलेली समिती पोलीस उपायुक्त आणि उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. कोणते गुन्हे मागे घ्यायचे याचा निर्णय या समितीकडून घेतला जाणार आहे. राज्य सरकारकडून 21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या दरम्यान राज्यात नोंद करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात केलेली आंदोलने आणि त्याविरोधात नोंद केलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. पण ज्या आंदोलनामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे, ते गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत. ज्या आंदोलनामध्ये वा गुन्ह्यांमध्ये जीवित हानी झालेलं नाही ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT