DA Hike Dainik Gomantak
महाराष्ट्र

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता होळीतच! सरकारकडून 3% डीए वाढीची घोषणा; केंद्राच्या निर्णयाकडे डोळे

Maharashtra Government 3% DA Hike: होळीच्या सणापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

होळीच्या सणापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात घसघशीत वाढ होणार असून, होळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर; 'या' तारखेपासून होणार लागू

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के झाला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वाढीव पगाराचे रोख देयके याच महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार आहेत. राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी (Arrears) मार्च २०२६ च्या पगारासोबत दिली जाईल. उर्वरित कालावधीच्या थकबाकीबाबत लवकरच स्वतंत्र आदेश काढले जातील.

पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ

या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील ५.१६ लाख सरकारी कर्मचारी आणि ८.७२ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. राज्याच्या तिजोरीवर यामुळे अतिरिक्त भार पडणार असला तरी, महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रापूर्वी केरळ सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात १० टक्क्यांची मोठी वाढ केली होती, ज्याची सध्या देशभर चर्चा आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम; ८ व्या वेतन आयोगाचे वेध

एकीकडे राज्य सरकारने खजिना उघडला असताना, केंद्रीय कर्मचारी मात्र अजूनही केंद्र सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ५८ टक्के असून, डिसेंबर २०२५ च्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI) आकडेवारीनुसार यात २ टक्क्यांची वाढ होऊन तो ६० टक्के होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सातव्या वेतन आयोगाची मुदत संपली असून, आता सर्वांचे लक्ष ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींकडे लागले आहे. आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती झाली असून, नवीन वेतन संरचना कधी लागू होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT