अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक; नेमके काय आहे प्रकरण?

माझ्यावर खोटे आरोप करणारे परमबीर सिंह आज कुठे आहेत. ते देश सोडून पळून गेले का असा सवाल अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यावेळी केला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराच्या आरोपाचे प्रकरण भोवलं असून ED ने त्यांना रात्री १ च्या सुमारास अटक केली. परमबीर सिंह (Parambir Singh)यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप अनेक आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने (ED) पाचवेळा समन्स देखील बजावले होते. त्यांची 5 कोटींची संपत्ती देखील जप्त करुन त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) देशमुख यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्याने अखेर सोमवारी सकाळी 11.50 ला अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. दरम्यान, ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी देशमुख यांनी एक ट्विट केले त्यात त्यांनी ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले आहे. अखेर आज त्यांना ईडीने अटक केली.

या प्रकरणात आतापर्यंत खूप नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांचे देखील सीबीआयने अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले. अनिल देशमुखांवर आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मात्र सध्या गायब आहेत. यांच्यावर देखील खंडणी उकाळण्याचे आरोप करण्यात आले असून त्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले आसा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अनिल देशमुखांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख देखील आपल्या कुटुंबासोबत गायब होते. पण आज ते ईडी कार्यालयात दाखल झाल्याने अनिल देशमुखांना अटक होणार की ते त्यांना या सगळ्यातून क्लिनचीट मिळणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. देशमुख यांनी आज ईडीसमोर आपली बाजू मांडली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, माझ्यावर खोटे आरोप करणारे परमबीर सिंह आज कुठे आहेत. ते देश सोडून पळून गेले का असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

देशमुखांना आतापर्यंत पाच वेळा ईडीचा समन्स

दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने याआधी 5 समन्स बजावले होते. त्यातील पहिले समन्स 25 जून रोजी देऊन 26 जूनला त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु ते हजर न राहिल्याने ईडीने त्यांनी लगेचच दुसरे समन्स 26 जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे 3 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. तिसरे समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. तर चौथे समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आले. मात्र, तरीही ते हजर राहिले नाही आणि कुटुंबासोबत कोठेतरी गायब असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर 16 ऑगस्टला त्यांना पाचवे समन्स बजाविण्यात आले होते, आणि त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितले. मात्र, देशमुख त्यावेळीही चौकशीसाठी गेले नाहीत. अखेर आज देशमुख ईडी समोर हजर राहत आले म्हणणे सविस्तर मांडल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.

नक्की काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवून दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले.

देशमुख वाझेंना म्हणाले, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होऊ शकातात. उर्वरित रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवत होते. पोलिसांना ते सातत्याने सूचना देत होते. पोलीस अधिकाऱ्यांना देशमुख त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला देण्याचे निर्देश द्यायचे.

हे सर्व माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नजरेत आले आणि त्यांनी त्यांच्यावर हे सर्व गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र देखील लिहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT