Radisson BLU Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Crisis: अरं बाबवं! बंडखोर आमदारांचा खर्च लाखोंमध्ये, जाणून घ्या

महाराष्ट्राच्या राजकीय संकटात गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन बीएलयू (Radisson BLU) सध्या चर्चेचे केंद्र बनले आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Crisis: महाराष्ट्राच्या राजकीय संकटात गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन बीएलयू (Radisson BLU) सध्या चर्चेचे केंद्र बनले आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी या हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलवर आज तृणमूल काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. हॉटेलबाहेर मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी भाजपविरोधी घोषणा दिल्या. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता स्थापन करावी अशी मागणी होत आहे. (maharashtra crisis guwahatis hotel radisson blu becomes point of attention)

दरम्यान, ट्विटमध्ये शिंदे यांनी लिहिले की, "गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) इतर पक्षांना फायदा झाला तर शिवसेनेला तोटा. जिथे इतर पक्ष मजबूत झाले, तिथे शिवसेनेची ताकद मात्र कमी झाली." पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक युतीतून बाहेर पडणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) हितासाठी हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये 'ऑपरेशन कमल' सुरु आहे.

दुसरीकडे, आसाम भाजप (BJP) आणि रॅडिसन ब्लूच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलच्या एकूण 70 खोल्या सात दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. हे बुकिंग करारबद्ध दराने आहे. आमदारांच्या राहण्याचा आणि खाण्याचा अंदाजित खर्च दररोज 8 लाख रुपये आहे, त्यामुळे बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये सात दिवस राहण्याचा आणि खाण्याचा खर्च सुमारे 56 लाख रुपये असेल. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी गुवाहाटीतील आलिशान हॉटेलच्या बाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासह रॅडिसन ब्लू हॉटेलला किल्ल्याचे रुप आले आहे.

शिवाय, बंडखोर आमदारांच्या गटाला गुवाहाटीतील आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे रॅडिसन ब्लू हॉटेलला किल्ल्याचं रुप आलं आहे. या हॉटेलमध्ये सध्या सर्वसामान्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. गुवाहाटी पोलिसांनी हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. नजिकच्या जलुकबारी पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांसह, राखीव बटालियन आणि आसाम पोलिसांच्या कमांडो युनिट्सचे डझनभर कर्मचारी हॉटेलवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हॉटेल लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT