महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आणखी तीन आमदार गुरुवारी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर छावणीत सामील झाले. आसामची राजधानी गुवाहाटीकडे रवाना झाले. शिंदे यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, सावंतवाडीचे आमदार दीपक केसकर, चेंबूरचे आमदार मंगेश कुडाळकर आणि दादरचे आमदार सदा सरवणकर हे सकाळी मुंबईहून गुवाहाटीला रवाना झाले.
बुधवारी गुवाहाटी येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी काही अपक्षांसह 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींना पत्र लिहिले होते, त्यावर शिवसेनेच्या 35 आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यात सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य सचेतक बनवण्यात आले.
दरम्यान शिवसेना आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डोळे लागले आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाचे राजकारणी म्हणून पाहिले जात आहे. फडणवीस यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान सागर येथे मंगळवारपासून रणनीती बैठक सुरू आहे. यामध्ये राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.
तसेच आता आषाडी एकादशीला पंढरपुरच्या विठूरायाची पुजा कोण करणार? राज्यातील हालचाली बघता हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला आणि विठूरायालाही भेडसावत असेल असे म्हणायला हरकत नाही. अशातच भाजपने एक पोस्टर लावले आहे, ज्यावर असे लिहिले आहे की, "हे माऊली, तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे, तुझ्या पंढरपुच्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे." हे पोस्टर औरंगाबाद येथे लावण्यात आले असून त्यावर भाजचा तरूण कार्यकर्ता कुणाल मराठेचं नाव दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.