Aditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

बंडखोरांना प्रचाराला देखील बाहेर पडू देणार नाही - आदित्य ठाकरे

वाईट याचं वाटतं की आम्हाला दगा आपल्या लोकांमूळे झाला

Sumit Tambekar

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने शिवसेनेत येण्याऐवजी नवे आखाडे बांधल्याने आता महाराष्ट्रातील राजकिय पेच प्रसंग वाढत असल्याची स्थिती आहे. शिवसेना खरी नेमकी कोणती यावरुन नामूष्कीची स्थिती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर येणार अशी स्थिती शिवसेना नेत्यांमूळे निर्माण झाली आहे. असे असताना आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांचा जाहीर मेळावा लाला लजपतराय महाविद्यालय सभागृह मुंबई येथे घेतला यात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकिय स्थितीवर भाष्य करत बंडखोरांना प्रचाराला देखील बाहेर पडू देणार नाही. असा थेट इशारा बंडखोर आमदारांना दिला आहे. (Maharashtra Crisis: Rebels will not be allowed to campaign - Aditya Thackeray's direct warning )

यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेत जी घाण होती ती आता गेली आहे. त्यामूळे शिवसेनेचं भविष्य अजून चांगले असणार आहे. कोरोना काळात संपुर्ण देशाला महाराष्ट्राने दिशा दिली. आणि हा महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने कोरोनाला हरवू शकला. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी कायम शिवसैनिकाचा विचार केला आहे. आणि यापूढे ही करत राहतील असे ते म्हणाले.

तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, मला वाईट याचं वाटतं की जो दगा फटका झाला. तो आपल्या लोकांमूळे झाला. विरोधक असते तर गोष्ट वेगळी होती. जे सामान्य कार्यकर्ते होते. त्यांना शिवसेनेने मोठं केले आहे. पण ते विसरले.पण लक्षात घ्या तुम्ही मुंबई विमान तळावरुन विधान भवनाकडे येणार असाल तर या रस्त्यावर शिवसैनिक आहेत. हे लक्षात ठेवा असा असे ही ते म्हणाले.

बंडखोरांनो तुम्हाला कधीच शिवसेनेइतका मान भाजप देणार नाही. तसेच यांना आता दोनच पर्याय राहीले आहेत. एक तर प्रहार अथवा भाजप पण यांना परत कधीच शिवसेनेत प्रवेश मिळणार नाही. असे ते म्हणाले. तसेच हे ही लक्षात ठेवा की शिवसैनिक तुम्हाला प्रचाराला बाहेर पडू देखील देणार नाही. असं ही ते यावेळी म्हणाले. तसेच दगाबाजांना शिवसेनेच दरवाजे कायमचे बंद आहेत असे ही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मी त्यांच्यासमोर सामान्य नेता", आरोग्यमंत्री राणेंचे आवडते मुख्यमंत्री कोण? Watch Video

IPL 2025: 13 कोटींचा खेळाडू 'यलो आर्मी'तून बाहेर! जडेजापाठोपाठ CSKचा आणखी एका स्टारला रामराम?

Ravindra Jadeja Record: रवींद्र जडेजानं रचला इतिहास, 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरला मागे टाकत केली 'ही' मोठी कामगिरी

सांताक्रूझ अपघातानंतर वीज विभागाची कारवाई; EE काशीनाथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली मोहीम!

भारतात DPDP कायदा लागू, Social Mediaवरील नियम अधिक कठोर होणार, काय बदल होतील? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT