भाजप नेत्याचं अजब विधान; सुशांतच्या दोषींना देवच शिक्षा करतो

सुशांत सिंग राजपूत आणि मॅनेजर दिशाच्या हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा महाराष्ट्र सरकारवर आरोप
Nikhil Anand
Nikhil AnandDainik Gomantak

कमी कालावधीत सिनेसृष्टीत अनेक यशशिखरे गाठणाऱ्या अभिनेता सुशांत सिंग याचा मृत्यू रहस्यमय मृत्यू झाला होता. या मृत्यूवरुन महाराष्ट्रासह संपुर्ण देशभर तर्क - वितर्क लावले जात होते. असे असताना भाजप प्रवक्त्याने महाराष्ट्र सरकारवर एक अजब विधान केले आहे. भाजप प्रवक्ते निखिल आनंद यांनी म्हटले आहे की, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या हत्येतील दोषींना वाचवण्यासाठी देव उद्धव ठाकरेंना शिक्षा देतो आहे. (statement of BJP leader on Maharashtra political crisis god is punishing the culprits of Sushant singh )

Nikhil Anand
Maharashtra Crisis: महाराष्ट्रात येणं सुरक्षित वाटत नाही- दीपक केसरकर

सुशांत सिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा यांच्या निर्घृण हत्येशी संबंधित पुरावे नष्ट केल्याचा आरोपही आनंदने महाराष्ट्र सरकारवर केला आहे. बिहारमध्ये पक्षाचे प्रवक्ते असण्यासोबतच निखिल आनंद हे ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. यापूर्वी, काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटने चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या तपासावर केंद्रीय अन्वेषण ब्यूरो "मौन" पाळल्याचा आरोप केला होता. केंद्र राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर स्वतःच्या ‘राजकीय अजेंडासाठी’ करत असल्याचा आरोप पक्षाने केला होता.

राजपूत (34) हे 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे भागातील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले होते, आणि सीबीआयने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तपास हाती घेतला होता. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले की, सुशांत सिंग राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूचा तपास सीबीआयने बिहार पोलिसांकडून घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. बिहार पोलिसांनी सीआरपीसी कलम 177 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर सर्वोच्च न्यायालयानेही समाधान व्यक्त केले होते.

Nikhil Anand
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; नवनीत राणा यांचे अमित शहा यांना आवाहन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com