Uddhav Thackeray and Bhagat Singh Koshyari  Dainik Gomantak
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून 16 तारखेचा मुहूर्त

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्य सरकार आणि राज्यपालांमद्धे अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्र सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 16 मार्च ही तारीख निश्चित केली आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठिवण्यात आला आहे. मात्र, राज्यपालांकडून अजून यावर प्रतिसाद आलेला नाही.

महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी खुल्या पद्धतीने घेण्यासंबंधीची सुधारणा नियमांमध्ये केली आहे. मात्र त्या सुधारीत नियमांना राज्यपालांनी आक्षेप घेतला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे सरकारचे (Government) नियोजन होते. मात्र राज्यपालांनी त्यात रोडा घातला. सरकार मधील अनेक नेत्यांनी राज्यपालांनाची भेट घेतली. मात्र राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्य सरकार आणि राज्यपालांमद्धे अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 16 मार्चला घेण्याचे ठरविण्यात आले. ही निवडणूक (Election) होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT