CM Pramod Sawant Visits Kolhapur Dainik Gomantak
महाराष्ट्र

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत कोल्हापूर दौऱ्यावर, महालक्ष्मी अंबाबाईचे घेतले दर्शन; जनतेच्या कल्याणाची केली प्रार्थना !

CM Pramod Sawant Visits Kolhapur: भाजपचे स्टार प्रचारक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज (9 नोव्हेंबर) प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी प्रचारादरम्यान कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले.

Manish Jadhav

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार घमासान रंगलं आहे. दोन्ही आघाडीतील नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. भाजपने बड्या-बड्या नेत्यांना महराष्ट्रात प्रचारसभा घेण्यासाठी राजकीय मैदानात उतरवले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे स्टार प्रचारक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज (9 नोव्हेंबर) प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी प्रचारादरम्यान कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी महालक्ष्मी अंबाबाईची मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांनी अंबाबाईकडे सर्वांना सुखी, समाधानी करण्याची प्रार्थना केली.

दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री सावंत सपत्नीक अक्कलकोट दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्याबरोबर महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी देखील होते. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते. आता यापुढे विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री सावंत महाराष्ट्रात प्रचारसभा घेतानाही दिसणार आहेत. खासकरुन कोकण पट्ट्यात मुख्यमंत्री सावंत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतील.

स्टार प्रचारक

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT