Maharashtra Assembly Budget 2023 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Budget Session: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे

दैनिक गोमन्तक

सत्ता बदलानंतर शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. 9 मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनातराज्यपाल रमेश बैस हे अभिभाषण करणार आहेत. तसेच विरोधक सत्ताधारी गटाला घेरण्याची शक्यता असल्याने हे अधिवेशन वादळी ठरणार आहे.

सत्ता संघर्षावरून विरोधात आणि सत्ताधारी यांच्यात वाद पेटला आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्याने हा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, एकमेकांवर सुरू आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

विरोधक सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासारख्या अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. या अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता बदल झाल्यावर पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT