young woman was arrested Dainik Gomantak 
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, 29 वर्षीय तरुणीला अटक

अल्पवयीन मुलगा घरी परतला आणि पोलिसांना घडामोडीची माहिती दिली

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील अकोला येथे एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पोस्को कायद्यान्वये कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही 29 वर्षीय महिला तिच्या पतीपासून वेगळी राहते. पोलीस (police) तरुणीची चौकशी करत आहेत.

आरोपी महिला एका डाळीच्या गिरणीत काम करायची, जिथे एके दिवशी एक अल्पवयीन मुलगा तिच्या नजरेस आला. तिने तिच्या सोबत मैत्री करत जवळीकता वाढवली. दरम्यान, महिला आणि अल्पवयीन यांच्यातील प्रेमसंबंध वाढल्याने आरोपी महिलेने त्याला शहराबाहेर नेले. सोबत राहणाऱ्या तिच्या बहिणीची मुलगी घरात काकू न दिसल्याने तिने रडत शेजाऱ्यांकडे जाऊन हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

अशा परिस्थितीत जेव्हा काकू सापडली नाही तेव्हा तो अल्पवयीन मुलगाही घरी नसल्याचे लोकांना आढळून आले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस तपास सुरू होताच, 9 फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगा घरी परतला आणि पोलिसांना घडामोडीची माहिती दिली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी (Accused) महिलेचा शोध घेऊन तिला अटक (arrested) केली. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Womens World Cup 2025: "एक वक्त था जब पाकिस्तान..." टीम इंडियानं विश्वचषक जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूचं विधान चर्चेत

Horoscope: 'या' 3 राशींचे नशीब चमकणार! गुरु-शुक्र केंद्र योग देणार अफाट यश आणि धनलाभ; करिअर आणि व्यवसायातही होणार मोठी प्रगती

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

SCROLL FOR NEXT