Lockdown Impact Dainik Gomantak
महाराष्ट्र

Lockdown Impact: असे आणखी किती अरबाज खान तयार होतील?

Lockdown या घटनेने केवळ पोलिसांसमोरच नव्हे तर आपल्या सर्वांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाने (Covid-19) कितीतरी लोकांना बेरोजगार केलं कितीतरी मजुरांचे कोरोना काळात खायचे हाल झालेत. अशा परिस्थितीत लॉकडाउनमध्ये (Lockdown) कितीतरी लोकांना नाइलाजास्तव वाईट दिवस बघायला लागले. अशातच मुंबई पोलिस आश्चर्यचकित झाले. जेव्हा त्यांनी एका अशा व्यक्तीला अटक केली ज्याच्या नावावर यापूर्वी गुन्ह्यांची एकही नोंद नव्हती. कोरोना कालात बराच काळ त्या व्यक्तीकडे नोकरी नव्हती. अशातच त्याचे खायचे वांदे होवू लागले. आणि या युवकाने भूक भागवण्यासाठी मुंबई लोकलमध्ये फक्त 120 रुपयाची चोरी केली. तो चालत्या ट्रेनमध्ये चढला. त्याने एका प्रवाशाच्या गळ्यावर ब्लेड ठेवले आणि त्याला धमकी देऊन 120 रुपयांची चोरी करून पळ काढला.

या घटनेनंतर पीडित प्रवासी राजू बिर्जे यांच्या तक्रारीवरून वसई रोड रेल्वे स्थानकात तैनात रेल्वे पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास सुरू केला आणि आरोपी अरबाज खान (वय 18) याला पकडले.SSC 23 जुलै तर HSC निकाल 2 ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता

जाणून घ्या पुर्ण प्रकरण

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलै रोजी राजू बिर्जे नालासोपारा ते वसई रोड रेल्वे स्थानक दरम्यान रात्री 9.15 वाजता जात होते. दरम्यान, आरोपी अरबाज खान चालत्या लोकलमध्ये चढला. त्याने गळ्यावर धारदार ब्लेड ठेवून राजूला धमकावले आणि 120 रुपये हिसकावले. यानंतर ही ट्रेन वसई रोड रेल्वे स्थानकावर पोहोचताच आरोपी अरबाज खाली उतरला आणि तेथून पळ काढला. यानंतर राजू बिर्जे यांनी वसई रोड रेल्वे स्थानकात उपस्थित पोलिसांना आपल्यासोबत झालेल्या या अपघाताविषयी सांगितले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 392 अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला. आणि तपास सुरू केला. या तपासणीत पोलिसांनी नालासोपारा आणि वसई रोडचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडले. आरोपीला राजू बिर्जेसमोर आणले आणि त्याची ओळख पटली.

लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेले असे, अरबाज खान तयार होत आहे.

पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपीचा मागील कोणताही रेकॉर्ड सापडला नाही. आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याने ही चोरी केवळ भुक भागवण्यासाठी केली आहे. हे उत्तर ऐकताच पोलिसांना धक्का बसला. या घटनेने केवळ पोलिसांसमोरच नव्हे तर आपल्या सर्वांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे की कोरोना काळात लॉकडाऊन बेरोजगारी इतकी वाढली आहे की तरुण पिढी गुन्ह्याच्या मार्गावर चालत आहे. जर खरोखर असे घडत असेल तर लॉकडाऊनमध्ये असे किती अरबाज खान तयार होत आहेत? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT