Tow Girls Dainik Gomantak
महाराष्ट्र

2 मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, लग्नाची वेळ आली तर गाठले पोलीस ठाणे

25 आणि 22 वर्षांच्या या दोन मुलींच्या मैत्रीचे रुपांतर काही दिवसांतच प्रेमात झाले. दोघींमध्ये वर्षभरापासून प्रेमसंबंध होते

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामध्ये दोन मुली एकमेकांच्या प्रेमात पडल्या आणि लग्नाची वेळ आल्यावर एका मुलीने पोलीस स्टेशन (Police) गाठलं. खरे तर एकाच कॉलनीत राहणाऱ्या दोन मुलींमध्ये घट्ट मैत्री होती आणि कॉलेजमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे त्या एकमेकांच्या घरी जाऊ लागल्या. त्याच्या घट्ट मैत्रिचे प्रेमात कधी रूपांतर झाले कळलंही नाही.

25 आणि 22 वर्षांच्या या दोन मुलींच्या मैत्रीचे रुपांतर काही दिवसांतच प्रेमात झाले. दोघींमध्ये वर्षभरापासून प्रेमसंबंध होते आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचे वचनही दिले होते. मात्र, काही दिवसांनी दुसऱ्या मुलीला आपल्या मैत्रिणीच्या वागण्यात बदल झाल्याचे जाणवू लागले.

तरुणीवर तिच्या मैत्रिणीने घरातून पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकला, त्यासाठी ती तयार नव्हती. त्यामुळे तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला मात्र वयाने मोठ्या असलेल्या मुलीने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली आणि लग्नासाठी दबाव टाकला.

25 वर्षांची तरुणी तिच्या मैत्रिणीला धमकावू लागली की लग्न केले नाही तर दोघींचे खाजगी फोटो सोशल मीडियावर टाकून ती व्हायरल करेल. यामुळे दुसरी तरुणी घाबरली आणि तिने औरंगाबादच्या महिला पोलीस हेल्पलाइनशी संपर्क साधला.

तरुणीने क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले, तेथे पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर दोघांनाही सोडून दिले. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ.गणपत दराडे म्हणाले की, सुरुवातीला हा सर्व प्रकार पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर महिला पोलिसांच्या मदतीने दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी दोघांच्या पालकांना बोलावून सर्वांचे समुपदेशन करून प्रकरण मिटवले. मात्र, औरंगाबाद पोलिसांसमोर असे पहिलेच प्रकरण समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT