Monsoon Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: मान्सून लांबणीवर! केरळ आणि महाराष्ट्रात कधी दाखल होणार पाऊस? जाणून घ्या अपडेट

केरळमध्ये यंदा चार दिवस उशीरा मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटलंय.

Pramod Yadav

Monsoon Update: मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. यावर्षी मान्सून काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. केरळमध्ये यंदा चार दिवस उशीरा मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटलंय. चार जून रोजी पाऊस दाखल होईल असा अंदाज खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनच्या पावसाला व्यवस्थित सुरुवात होऊ शकते. तसेच, जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस येईल असा अंदाज आहे.

तर, मुंबईत यंदा 10 किंवा 11 जूनला मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता आहे. 12 जुलैनंतर मान्सूनच्या पावसाची सुरुवात होईल तर, 27 जुलैपासून मान्सूनचा पाऊस येईल अशी शक्यता आहे.

एका अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून सरासरी 96 टक्के एवढी व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआर भागात जूनच्या अखेरीस मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो. 19 ते 24 जून दरम्यान पावसाची उच्च संभाव्यता आहे. 24 जूनपासून मान्सूनचा पाऊस अपेक्षित आहे.

दरम्यान, केरमध्ये एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो व त्यानंतर एक आठवड्याभरात महाराष्ट्रात येतो. पण, यावर्षी अंदमानमध्ये मान्सून उशीरा दाखल होत असल्याने पुढे देखील त्याला उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President: नितीन नबीन भाजपचे नवे 'सारथी'! अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT