Maharashtra HSC Board Result 2022  Dainik Gomantak
महाराष्ट्र

लाखो विद्यार्थांना निकालाची वाट, जाणून घ्या महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल कधी लागणार?

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 12वी चा निकाल जाहीर होणार.

दैनिक गोमन्तक

Maharashtra HSC Board Result 2022: महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. निकाल जाहीर करण्यासाठीची सरकारची सर्व तयारी झाली आहे. मंडळाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल बुधवारी 8 जून 2022 रोजी दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे.

मात्र, अद्याप निकालाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांना आता लवकरच त्यांचा निकाल पाहता येणार आहे. सर्व प्रथम, निकाल बोर्डाच्या अधिकृत साइटवर प्रसिद्ध केला जाईल.

प्रथम निकाल या वेबसाइट्सवर उपलब्ध होतील

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होतील. निकालाबाबतची अधिकृत घोषणा अवघ्या काही दिवसांत होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाईट क्रॅश झाल्याचे बहुतांश घटनांमध्ये दिसून आले आहे, अशा स्थितीत विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अनेक ठिकाणी पाहता येतो. एखादी वेबसाइट क्रॅश झाली तर ते दुसऱ्या वेबसाइटवर पाहू शकतात. पण बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून विद्यार्थांनी विश्वासार्ह निकाल बघावा असे आवाहन केले जात आहे.

लाखो विद्यार्थींना बारावीच्या निकालाची वाट

अहवालानुसार, यावेळी महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेत 14.72 लाख विद्यार्थी बसले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. यावेळी निकाल जाहीर होण्यास बराच वेळ लागत आहे.त्याचे कारण म्हणजे शिक्षकांनी संप सुरू केला आहे. मात्र, लवकरच निकाल जाहीर होणार असल्याच्या चर्चा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सहज तपासता येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल स्वतंत्रपणे जाहीर होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT