Raj Thackeray News|Ayodhya Visit Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरे अयोध्येत कसे येतात बघूच; बृजभूषण यांच्यानंतर भाजपाच्या मित्रपक्षाचाही इशारा

आयोध्या दौऱ्याबाबत मनसेचाही आक्रमक पवित्रा

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जूनला अयोध्या दौरा प्रस्तावित आहे. मात्र राज ठाकरे यांचा प्रवास भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) फूट पाडणारा आहे. कारण ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला जेडीयूने कडाडून विरोध केला आहे. (Raj Thackeray Ayodhya Visit)

महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वाने राज यांच्या भूमिकेबाबत थेट भूमिका मांडलेली नाही. पण उत्तर प्रदेशातीलभाजपाचे बृजभूषण यांनी राज ठाकरेंनाउत्तर प्रदेशात येऊन देणार नसल्याची भूमिका मांडली आहे. तशातच आता भाजपाचा रालोआ आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने देखील राज यांच्या आयोध्या दौऱ्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जद(यू) कडून राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध नाही, पण त्यांनी एक मागणी केली आहे. ती मागणी पूर्ण झाल्यास राज यांचे उत्तर प्रदेशात स्वागत करू अन्यथा ते इथे कसे येतात तेच बघू, असा इशारा जद(यू) ने दिला आहे.

बिहारमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या JD(U) ने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे आणि उत्तर भारतीयांबद्दलच्या भूमिकेबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांच्यावर हल्लाबोल केला

एका इंग्रजी वेबसाइटशी बोलताना जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले, "आम्ही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधात नाही. पण आम्ही त्यांच्या उत्तर भारतीयांबद्दलच्या भेदभावाच्या विरोधात आहोत.

राज ठाकरेंनी माफी मागावी

त्यागी पुढे म्हणाले, "राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि ते चुकीच्या मार्गावर होते हेही मान्य करावे. अन्यथा ते अयोध्येला जाण्याचे धाडस कसे करू शकतात? ते उत्तर भारतीयांचे शत्रू नंबर 1 आहेत." ठाकरेंच्या विरोधात जेडी(यू) च्या भूमिकेचा भाजपशी असलेल्या पक्षाच्या संबंधांवर परिणाम होईल का, असे विचारले असता त्यागी म्हणाले, "वेळोवेळी एनडीए आघाडीने राज ठाकरेंच्या राजकारणाच्या ब्रँडला विरोध केला आहे.

ठाकरे यांच्या 4 जूनच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या विरोधाचाही त्यांनी उल्लेख केला. कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह ठाकरे यांच्या विरोधाचे नेतृत्व करत आहेत, असे ते म्हणाले. या निषेधार्थ जेडीयू ब्रिजभूषण शरण यांना पाठिंबा देत आहे. आम्ही भाजपलाही विनंती करतो की ठाकरेंसोबत पाहू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Goa Accidents: दक्षिणेतील अपघाती मृत्यूत 84 टक्के घट; वाहतूक विभाग उपअधीक्षक प्रभुदेसाई यांची माहिती

Gajalakshmi Rajyog: सुखाचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगामुळे 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार अमाप संपत्ती आणि मानसन्मान

SCROLL FOR NEXT