ओबीसी आरक्षणावरुन नाना पटोलेंचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

''केंद्राने चार दिवसात अशी काय जादू केली की मध्य प्रदेशला आरक्षण मिळाले ?''
Nana patole
Nana patoleDainik Gomantak
Published on
Updated on

मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची परवानगी दिली आहे. यावरुन महाराष्ट्रात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते देवेंद्र यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील सरकार महाराष्ट्रासोबत सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. ( Nana Patole castigates Central Government over OBC reservation )

Nana patole
हैदराबादच्या भक्ताने केले शिर्डी दरबारी 4 किलो सोने दान, किंमत जाणून बसेल धक्का

याबाबत पुढे म्हणाले कि, मध्यप्रदेशच्या आदेशाच्या निकालाची कॉपी हाती आली नाही. केंद्रात बसलेल्या सरकारने अशी काय जादू केली, किंवा काय डेटा दिला आणि त्या राज्याला आरक्षण मिळाले. हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची कॉपी हाती आल्यावर कळेल. पण केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारसोबत सूडबुद्धीने वागत आहे, आरक्षण संपण्याचा घाट सुरू आहे. त्याचाच चमत्कार तर नाही ना?"

"राज्य सरकारचे बांठिया आयोगाचे काम सुरू आहे. राज्य सरकारने डेटा का तयार केला नाही याचा जवाब काँग्रेस विचारेल. संविधानिक व्यवस्थेप्रमाणे मगासवर्गीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. सत्तेपेक्षा मागासवर्गीय आरक्षणाचे महत्व आम्हाला जास्त आहे. आता या सगळ्या गोष्टी तपासून निर्णय घेऊ."भारतीय जनता पक्षाच्या बलिशपणाला तोड नाही, भाजपचा सत्तेसाठी हपापला आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्न नाही असंही नाना पटोले म्हणाले.

Nana patole
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची हत्या झाली - देवेंद्र फडणवीस

मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही असा प्रश्न विचारला जातोय. मध्यप्रदेशला मागच्या आठवड्यात दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने देशभरात लागू केला होता. तसाच आता हा देखील निर्णय संपूर्ण देशाला लागू करा, अशी मागणी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com