शिवसेनेचे नेते रामदास कदम हे पक्षाला 'राम राम' करणार अशी चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा पक्षांतर्गत वाद सुरू होता. महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते त्या वेळी रामदास कदम यांच्याकडे मंत्रीपद होते. आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले. पत्रकार परिषदेत परब (Anil Parab) यांच्यावर हल्लाबोल करत शिवसेना राष्ट्रवादीत आणण्याचा डाव हा परब यांचा आहे असा आरोप त्यांनी केला.
शिवसेना (Shiv Sena) पक्ष कधीच सोडणार नाही परंतु पक्षातून जरी काढले तरी कायम शिवसेनाच नेता म्हणून राहील. बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शपथ घेऊन रामदास कदम म्हणेल, पक्षाला हानी होईल अशी कोणतेही बाब केलेली नाही. एकाच पक्षातील दोन नेत्यांचे वाद बाहेर येऊ नयेत. तसेच सोमय्या यांच्याशी कधीही बोलणे झाले नाही, तसेच कोणतेही कागदपत्र दिलेलं नाही असे कदम यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, अनिल परब (Anil Parab) हे पक्षाचे गद्दार आहेत. परब मागील 2 वर्षात सर्व जिल्ह्य वाऱ्यावर सोडला आहे. त्यांना जिल्ह्यातील काहीच माहिती नाही. परब यांच्यावर बोललो तर मी पक्षावर बोललो असे होत नाही. या लोकांची खाजगी प्रॉपर्टी हि शिवसेनेची होत नाही. असे ही रामदास कदम म्हणाले.
पुढे बोलताना कदम म्हणाले की, संजय कदम यांना मी मोठे केले आहे. पण त्याने पक्ष सोडला आणि भगवा झेंडा तुडवला. आणि त्यांना आता हाताशी धरलं जात आहे. उदय सामंत यांना बोलावलं आणि आता त्यांच्याकडून पक्ष निष्ठा काय असते हे शिकावे लागत आहे. परब हे शिवसेनेला गहाण ठेवत आहेत. मग गद्दार कोण आहे, असा सवाल ही त्यांनी केला. एसटी कर्मचारी संप सुरु आहे त्यातच काही लोकांनी आत्महत्या देखील केल्या आहे. परंतु परब यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परब यांची भाषा अशी ही राष्ट्रवादीचा नेता म्हणून आहे. शिवसेना म्हणजे काय हे आता आम्हाला उदय सामंत सांगणार का? आम्ही शिवसेनेत 52 वर्ष काम केले आहे, असंही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.