महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) 'यलो अलर्ट'  Dainik Gomantak
महाराष्ट्र

IMD कडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

सोमवारपर्यंत महाराष्ट्र (Maharashtra) आणि गोव्यात (Goa) मेघगर्जनेसह पावसाची (Rain) शक्यता आहे. सोमवारी बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर भारतातील बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये थंडीचा जोर वाढू लागला आहे. यासोबतच देशातील अनेक भागात थंडी वाढत आहे. दरम्यान, उद्या महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पूर्व अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अवकाळी पावसाची (Rain) शक्यता आहे.

हवामान खात्याने महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व अरबी समुद्रात 50-60 किमी ताशी आणि 70 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि इतर भागात 40-50 किमी प्रतितास ताशी गारवारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे IMD ने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

पूर्व मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. ते आज संध्याकाळपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 ते तीव्र होऊन भारतीय किनारपट्टीपासून पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची अंदाज आहे. हे चक्रवादळ समुद्रसपाटीपासून सरासरी 5.8 किमी पर्यंत पसरत आहे. त्याच वेळी, आंध्र प्रदेश किनार्‍याजवळ पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून 5.8 किमी पर्यंत चक्रीवादळाचे परिवलन पसरत आहे.

महाराष्ट्र आणि गोव्यात पावसाचा अंदाज

सोमवारपर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारी बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून चक्रीवादळ पश्‍चिमेकडे सरकून दक्षिण भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पाऊस किंवा बर्फ पडण्याची दाट शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातही शुक्रवारी पाऊस किंवा बर्फ पडण्याची शक्यता आहे. या काळात उत्तर भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT