salt to breakfast Dainik Gomantak
महाराष्ट्र

मीठाने घेतला जीव; पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून

40 वर्षीय पत्नीची नाश्त्यात जास्त मीठ घातल्याच्या रागातून नवऱ्याने हत्या केली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील भाईंदर टाऊनशिपमध्ये एका व्यक्तीने आपल्या 40 वर्षीय पत्नीची नाश्त्यात जास्त मीठ घातल्याच्या रागातून हत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी भाईंदर पूर्वेतील फाटक रोड परिसरात घडली आहे. या घटनेनंतर रात्री उशिरा आरोपीला पकडण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी माध्यमांना सांगितले. एक दिवसापूर्वी ठाण्यातच एका सासऱ्याने आपल्या सुनेवर चहा नाश्ता न दिल्याने गोळ्या झाडल्या होत्या असे चित्र समोर आले. (Husband kills 40 year old wife for adding too much salt to breakfast)

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे नाव 46 वर्षीय नीलेश घाघ आहे. तिला न्याहारीसाठी खिचडी देण्यात आली आणि त्यामध्ये मीठ जास्त होते, त्यानंतर झालेल्या वादातून आरोपीने सकाळी साडेनऊच्या सुमारास पत्नी निर्मला हिचा कपड्याने गळा आवळून जिवे मारले.

दोघांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे,

शेजाऱ्यांनी हत्येची माहिती पोलिसांना दिली, यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. भायंदर येथील नवघर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने सांगितले की, तो अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून पत्नीशी भांडत होता.

विशेष म्हणजे अशीच एक घटना गुरुवारी घडली होती, ज्यामध्ये वेळेवर चहासोबत नाश्ता न दिल्याने संतापलेल्या सासऱ्याने सुनेवर गोळ्या झाडल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे. राबोडी भागातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय महिलेच्या पोटात गोळी लागल्याने शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT