कोल्हापूर : महाराष्ट्रात मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी 18 हजार 901 मतांच्या मताधिक्याने मोठा विजय मिळविला आहे. निकालानंतर आलेल्या अंतिम आकडेवारीत जयश्री जाधव यांना एकूण 96 हजार 226 मत मिळाली तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना 77 हजार 426 मत मिळाली. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवली होती. (Jayashree Jadhav victory in Kolhapur North by election Satej Patil became the sculptor)
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपने माजी नगरसेवक सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती. निकालानंतर विजयी उमेदवार जाधव यांचे अभिनंदन करण्यात येत असून समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आताषबाजी करत एकच जल्लोष केला.
या निवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी जवळपास 61 टक्के मतदान झाले होते. एकूण 2 लाख 91 हजार 978 मतदारांपैकी 1 लाख 78 हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर आज राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात मतमोजणी पार पडली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर 26 फेऱ्यांत 357 केंद्रावरील मतमोजणी करण्यात आली. यात सुरुवातीपासून म्हणजे पोस्टल मतांच्या फेरीपासूनच जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. ती त्यांनी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.