मशिदीवरील भोंगे न हटवल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येणाऱ्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. आज हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे कालच पुण्यात पोहोचले आहेत. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. एका अर्थी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधी आंदोलनाचा हा श्रीगणेशा असल्याचंच राजकीय वर्तुळात चर्चा चालली होती. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात राजगर्जना होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान जे पोस्टर मनसेनं लावलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले गेले नाहीत. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम असल्याचं दिसत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरती पार पडणार आहे.
राज ठाकरे एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात वक्तव्य विधानं शरद पवार (Sharad Pawar) यांनी करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवलं. हे सगळं राजकारण आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष आणखी काय बोलतात याविषयी राज्यभरात नक्कीच उत्सुकता असणार आहे.
ठाण्यातील उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर टीका केली होती. गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात मशिदींवरील भोंगा, मदरशांमधील गैरप्रकार या सर्व प्रकारांच्या मुद्द्यांच्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाय त्या भाषणात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज ठाकरेंनी चौफेर हल्ला चढवला होता. गुढीपाडवा आणि ठाण्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट आहे. आता या महाआरतीमध्ये राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूरा असतो, आणि त्या आवाजाचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवलेच पाहिजेत. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाहीये. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं, 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही, असे राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.