Sindhudurg Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg: बायकोने दारुसाठी 50 रुपये न दिल्याने नवऱ्याने संपवले आयुष्य

Vaibhavwadi News: पैशांची व्यवस्था करण्यासाठी पत्नी शेजारीच राहत असलेल्या जाऊकडे गेली असता नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.

Pramod Yadav

Sindhudurg News

सिंधुदुर्ग: बायकोने दारुसाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात पतीने आत्महत्या केल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतून समोर आली आहे. आचिर्णे- बौद्धवाडी येथे शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.

विलास धोंडू कदम (वय ५८, रा. आचिर्णे- बौद्धवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विलास यांना दारुचे व्यसन होते. शुक्रवारी त्यांनी दारुसाठी पत्नीकडे ५० रुपयांची मागणी केली. कालच पैसे दिल्याचे कारण सांगत आज कोठून देऊन देऊ, असा सवाल पत्नीने उपस्थित केला. दरम्यान, यामुळे विलास यांना राग अनावर झाला.

पैशांची व्यवस्था करण्यासाठी पत्नी शेजारीच राहत असलेल्या जाऊकडे गेली. यावेळेत विलास यांनी टॉवेच्या मदतीने घराच्या लाकडी बारला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी पुन्हा घरात आली असता पतीचा मृतदेह लटकलेला दिसून आला. पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक गोळा झाले. ग्रामस्थांनी गळफास काढून विलास यांनी खाली उतरवले.

दरम्यान, तोपर्यत फार उशीर झाला होता. विलास यांच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले आणि एव विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: तिकीटची माहिती, ट्रेन लोकेशन, सुविधा… कोकण रेल्वेनं लाँच केलं 'KR Mirror' अ‍ॅप, एका क्लिकवर मिळणार A टू Z माहिती

Watch Video:"जेणें तुमकां पेजेक लायलां तें सरकार तुमकां जाय?सरदेसाईंचा तरुणांना सवाल; बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर

Maoist Sujata Surrender: कुख्यात माओवादी सुजाताचे 43 वर्षानंतर आत्मसमर्पण; सरकारने जाहीर केले होते एक कोटी रुपयांचे बक्षीस

Viral Video: 'क्रिकेटचा देव' थोडक्यात बचावला, जंगलात मदतीची वाट पाहत बसला; सचिनसोबत नेमकं घडलं काय? पाहा व्हिडिओ

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

SCROLL FOR NEXT