Dabolim Bogmalo: दाबोळी चौकातील व्यवस्थेत सुधारणा, मात्र नियम मोडण्याचे प्रकार सुरूच; शॉर्टकट मारण्याऱ्यांमुळे वाढतोय धोका

Dabolim Bogmalo Junction: दाबोळी-बोगमाळो चौकातील वाहतूक व्यवस्थेसंबंधीच्या दै. गोमन्तकच्या वृत्ताची दखल घेत तेथे काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
Dabolim Bogmalo Junction
Dabolim Bogmalo JunctionDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: येथील दाबोळी-बोगमाळो चौकातील वाहतूक व्यवस्थेसंबंधीच्या दै. गोमन्तकच्या वृत्ताची दखल घेत तेथे काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि, अद्यापही काही वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने हाकत आहेत. त्यामुळे अपघातात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दाबोळी-बोगमाळो चौकात उड्डाण पुलाच्या खांबांचे बांधकाम सुरू असल्याने तेथील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मात्र वाहतूक व्यवस्थेत बदल करताना तेथे योग्य खबरदारी न घेतल्याने तसेच जुने वाहतूकविषयक फलक तेथून हटविण्यात न आल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत होता.

Dabolim Bogmalo Junction
Goa Road Accident: गोव्यात मागील 5 वर्षात रस्ते अपघातात 1,022 जणांनी गमावला जीव

याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तेथे काही बदल करण्यात आले आहेत. तेथील त्रिकोणी दुभाजक आता चौकोनी व रुंद करण्यात आला आहे. तसेच तेथील जुने फलक हटविण्यात आले आहेत. वाहतूक वळविण्यात आल्यासंबंधीचे फलक योग्य ठिकाणी लावण्यात आले आहेत. ते वाहनचालकांच्या नजरेस येत आहेत.

Dabolim Bogmalo Junction
Dabolim Bogmalo: दाबोळी-बोगमाळो चौकात वाहतुकीचे तीनतेरा, बॅरिकेड्स हटवल्याने वाढले अपघात; जुन्या नव्या फलकांमुळे संभ्रम

कडक कारवाईची मागणी

बोगमाळो येथून महामार्गावर आल्यावर सांकवाळ, वेर्णाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आल्यासंबंधीचे ठळक फलक लावण्यात आले आहेत. मात्र वाहतूक नियमाचे उल्लंघन करण्याची सवय झालेले अद्याप त्या मार्गाचा उपयोग करीत नाहीत. ते शॉर्टकट मारून चुकीच्या दिशेने वाहने हाकत आहेत. त्यामुळे बोगमाळोकडे जाणाऱ्या तसेच वेर्णा येथून दाबोळीकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी धोका निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांनी नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com