Fire in Tarapur MIDC Dainik Gomantak
महाराष्ट्र

तारापूर MIDC मध्ये भीषण अग्नितांडव

मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत अनेक स्फोट; अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रणाचे शर्थीचे प्रयत्न

आदित्य जोशी

पालघर : पालघरच्या तारापूर एमआयडीसी परिसरात मंगळवारी रात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. एमआयडीसी प्लांटमध्ये आग लागल्यानंतर सलग 8 स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून अजूनही आग धुमसतीच असल्याची माहिती आहे. (Fire in Tarapur MIDC Maharashtra)

तारापूर एमआयडीसीमध्ये मंगळवारी रात्री उशिरा प्रीमियर इंटरमिडिअरी नावाच्या एका केमिकल कंपनीत आग लागल्याची माहिती आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरीही आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचे चित्र आहे. याच भागात गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. ज्या केमिकल कंपनीत आग लागली आहे, त्याठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत आहेत.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र ज्वलनशील केमिकलमुळे आगीवर अजूनही नियंत्रण मिळू शकलेलं नाही. आगीवर वेळीच नियंत्रण मिळालं नाही तर मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे अग्नितांडवानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आहेत, ज्यामुळे स्थानिकांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आहे. याच परिसरात दोन महिन्यांपूर्वी एका दुसऱ्या कंपनीत आग लागल्याची घटना घडली होती, ज्यात एका व्यवस्थापकाचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लिव्ह-इन पार्टनर परतली नवऱ्याकडे, प्रियकराची याचिका फेटाळत कोर्टानं झापलं; म्हणाले, 'अशा नात्यांना कायद्याचं कवच देता येणार नाही'

पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Hamza Burhan killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड 'हमजा बुरहान' ठार; मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडून संपवलं

Pharmacy Strike: इस्‍पितळे वगळता इतर फार्मसी दिवसभर होत्या बंद; 'AIOCD'च्‍या देशव्‍यापी आंदोलनाला गोव्‍यातूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT