Aryan Khan

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

दैनिक गोमन्तक

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला दिलासा मिळाला आहे. कोर्टाने आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यापासून सूट दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले आहे की, जेव्हाही दिल्ली SIT समन्स बजावेल तेव्हा आर्यनला हजर राहावे लागेल. विशेष म्हणजे आर्यनने जामिनाच्या अटींमध्ये सुधारणा करण्यासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान याने ड्रग-ऑन-क्रूझ प्रकरणात जामीन मिळण्याची अट म्हणून अमली पदार्थ विरोधी एजन्सीच्या कार्यालयात साप्ताहिक हजेरीची अट बदलण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्यनच्या अर्जात त्याने दर शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) दक्षिण मुंबई कार्यालयात हजर राहण्याची अट माफ करण्याची मागणी केली होती. हा तपास आता दिल्ली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आल्याने त्याची मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची अट शिथिल करता येईल, असे या अर्जात म्हटले आहे. ड्रग्ज बाळगणे, सेवन, विक्री आणि खरेदी केल्याच्या आरोपाखाली NCB ने 3 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका क्रूझ जहाजावर छापा टाकून आर्यनला अटक केली होती. त्याला 28 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: गोवा आघाडीत बिघाडी? पाटकरांच्या 'त्या' विधानाला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरेंचाही पाठींबा!

ISL 2024-25: आजच्या सामन्यात एफसी गोवाला ऐतिहासिक विक्रमाची संधी! ठरणार पहिलाच संघ

Cutbona Jetty: 'ते' अजूनही 'कुटबण' स्वच्छतेत सामील होऊ शकतात! मंत्री सिक्वेरांचे आमदार सिल्वांना आवाहन

Cuncolim IDC: ..तर लोकच कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत बंद पाडतील! फिशमिल प्रदूषणावरुन आलेमाव यांचा इशारा

Goa: गोव्यात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची आता खैर नाही, थेट वाहन जप्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT