शिर्डी: देशभरात आज गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima) उत्सव साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेचा उत्सव मुख्य दिवस असल्याने महाराष्ट्राताील साईबाबांच्या (Sai Baba) शिर्डी (Shirdi) मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यदाही कोरोनाच्या (Covid-19) निर्बमधामुळे भक्तांविनाच शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. कोरोना महामारी संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भक्तांविना गुरुपौर्णिमा करण्यात येत आहे. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला आहे. दरवर्षी तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम यांदा मात्र थोडक्यात आटोपला गेला. (Guru Purnima festival has started in Shirdi)
तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला साईबाबांच्या शिर्डीत कालपासून सुरुवात झाली आहे. आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे. आज पहाटे साईबाबांच्या काकड आरती ने गुरु पौर्णिमेला सुरुवात झाली. त्यानंतर साईंच्या फोटोची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली.
साईंच्या शिर्डीत भक्तांविना गुरुपौर्णिमा
काही निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई समाधि मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिर आणि परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.त्याचबरोबर साई मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.