गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या धुवांधार पावसामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) तिल्लारी धरणाची (Tillari Dam) पातळी वाढत असली, तरी अद्याप जलसाठ्याने धोक्याची पातळी गाठली नसल्याची माहिती मिळाली आहे. धरण प्रकल्प अधिकारीणीने अद्याप धोक्याचा 'अलर्ट' दिला नसला, तरी पावसाचा जोर पाहता धरणातून मोठ्या प्रमाणात जलविसर्गाचा धोका वाढला आहे. आजच्याप्रमाणेच उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील एक-दोन दिवसात धरणातून जलविसर्ग अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शापोरा नदीकाठी भिती पसरली आहे.
113.20 मीटर ही धरणातील जलसाठ्याची पातळी आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी 109 मीटरहून अधिक वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणातील पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आणि जलविसर्गाचा धोका टाळण्यासाठी धरणातील अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्याचा निर्णय धरण प्रकल्प अधिकारीणीने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. आज दिवसभरात सायंकाळपर्यंत तिळारी परिसरात 71.6 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.
शापोरा तुडूंब
तिल्लारी धरणात जलविसर्ग सुरु झाला की अतिरिक्त पाणी शापोरा नदीत सोडण्यात येते. त्यामुळे शापोरा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढते. सद्यस्थितीत मुसळधार पावसामुळे साळ, मेणकूरेहून वाहणारी शापोरा नदी तुडूंब भरली आहे. त्यामुळे नदीकाठी भिती पसरली आहे. सायंकाळी साळ बंधाऱ्यावरील पदपुलापर्यंत पाणी पोचले होते. सखल भागातही पाणी साचले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.