Amboli Accident News Dainik Gomantak
महाराष्ट्र

गोव्यातील कॅसिनोत घेतली दारू, गुजरातमधील उद्योगपतीच्या लेकाचा सावंतवाडीत राडा; पोलिसांनी घडवली अद्दल

युवक स्वत: इंजिनिअर असून, त्याचे वडील गुजरात येथे मोठे उद्योगपती आहेत.

Pramod Yadav

गोव्यातील कॅसिनोत दारू पिल्यानंतर युवक मद्यधुंद अवस्थेत महागडी रेंज रोव्हर घेऊन पाडला. या युवकाने सावंतवाडीत अनेक वाहनांना धडक दिली. सावंतवाडी पोलिसांनी युवकाला आंबोली येथे अटक करत त्याच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

युवक हा मुळ गुजराज मधील असून त्याचे वडील मोठे उद्योगपती आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवत त्याने अनेक वाहनांचे नुकसान केले तसेच, इतरांचा जीव देखील धोक्यात घातला. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करताच झिंग उतरल्यानंतर आपण चुकल्याचे त्यांनी पोलिसांसह न्यायालयाकडे मान्य केले. युवकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गोव्यातून युवक गुजरातच्या दिशेने जात होता. सावंतवाडी झाराप झिरो पॉईंट आणि आंबोली मध्ये भरधाव वेगाने जाताना त्याने अनेक वाहनांना धडक दिली. सावंतवाडी पोलिसांनी युवकाविरोधात सरकारी कामात अडथळा करणे तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

करण कमलेशभाई गल (वय 28, रा. गुजरात) असे युवकाचे नाव असून, तो स्वत: इंजिनिअर आहे. तर, त्याचे वडील गुजरात येथे मोठे उद्योगपती आहेत. तो गोव्यात फिरण्यासाठी आला होता.

गोव्यात कॅसिनोमध्ये दारु पिल्यानंतर तो मित्राची रेंज रोव्हर कार घेवून सावंतवाडीत गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT