Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर गोवा सोडणार? रणजीच्या संभाव्य यादीत नाही केला समावेश

अर्जुन तेंडुलकर देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून खेळणार असल्याची माहिती आहे.
Arjun Tendulkar
Arjun TendulkarDainik Gomantak

IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अचानक बेपत्ता झाला आहे. तो आता देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून खेळणार असल्याची माहिती आहे.

अर्जुनची होम टीम गोव्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी मुंबई सोडून गोव्यासाठी खेळायला सुरुवात केलेला अर्जुन आता गोवाही सोडू शकतो असे सांगितले जात आहे.

गोवा क्रिकेट संघासाठी 28 खेळाडूंची यादी जाहीर 18 जुलै रोजी करण्यात आली होती. रणजी ट्रॉफी 2023-24 च्या हंगामासाठी या खेळाडूंची संभाव्य यादी आहे. या यादीत अर्जुन तेंडुलकरच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे आगामी रणजी मोसमात तो गोव्याकडून खेळणार नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, अर्जुन देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून खेळताना दिसणार आहे. गोव्याचा संघही दक्षिण विभागात येतो. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरच्या नावाचा रणजी ट्रॉफीसाठी समावेश न झाल्यास तो गोवा वगळता अन्य कोणत्याही संघातून खेळू असे मानले जात आहे, परंतु याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

Goa Ranji Cricket Team
Goa Ranji Cricket TeamDainik Gomantak
Arjun Tendulkar
गोवा सरकारचा 'पेटीएम' आणि 'येस बँक'सोबत सामंजस्य करार

अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 7 लिस्ट ए आणि 7 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. लिस्ट ए मध्ये अर्जुनने 8 विकेट्स घेतल्या आहेत तर फर्स्ट क्लासमध्ये त्याच्या नावावर 12 विकेट आणि 120 धावा आहेत. याशिवाय त्याने टी-20 मध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरला यंदा मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्याने मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीत चार विकेट घेतल्या, तर फलंदाजीत त्याला फारशी संधी मिळाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com