Grand Homecoming ANI
महाराष्ट्र

हौसेला मोल नाही! 'कन्यारत्ना'चे हेलिकॉप्टरमधून थाटात आगमन

पण आता काळ बदलला आहे. मुलगी ओझे नसून आई-वडिलांची लाडाची लेक झाली आहे. मुलीच्या जन्माने आता घरात हर्ष बघायला मिळतो.

दैनिक गोमन्तक

पुणे : एक काळ असा होता की मुलींना ओझे मानले जायचे. एवढेच नाही तर मुलीला जहराची पुडी म्हणून संबोधले जायचे, मुलगी जन्माला आल्याने कुटुंब दु:खी व्हायचे, घरातील सुनेवर वंशाचा दिवा मुलगाच पाहिजे म्हणून दबाव असायचा. पण आता काळ बदलला आहे. मुलगी ओझे नसून आई-वडिलांची लाडाची लेक झाली आहे. मुलीच्या जन्माने आता घरात हर्ष बघायला मिळतो. आता अनेक आई-वडील मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करतात. महाराष्ट्राच्या (Maharashtra) पुणे जिल्ह्यात मुलीच्या जन्मामुळे कुटुंब इतके आनंदित झाले की तिच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आणि तिला हेलिकॉप्टरने घरी आणण्यात आले.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शेलगाव येथील जरेकर कुटुंबीयांनी मुलीच्या जन्मामुळे आनंदी होऊन तिला हेलिकॉप्टरने गावात आणले. नवजात मुलीचे वडील विशाल जरेकर यांनी सांगितले की, आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर तिचे स्वागत खास करण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरची व्यवस्था करून तिला घरी आणले. एएनआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मुलीचे वडील तिला हेलिकॉप्टरने घेऊन गावात उतरले आणि तेथे उपस्थित कुटुंबीयांनी मुलीचे स्वागत केल्याचे दिसून येते.

या हेलिकॉप्टर राईडसाठी कुटुंबाने एक लाख रुपये खर्च केले. मात्र, एखाद्या कुटुंबाने मुलीचा जन्म अशा पद्धतीने साजरा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी राजस्थानमधील नागौरमध्ये एका कुटुंबाने मुलीच्या जन्माचा असाच उत्सव साजरा केला होता. येथे 35 वर्षांनंतर एका शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली आणि कुटुंबीयांनी मुलीला तिच्या माहेरच्या घरातून हेलिकॉप्टरमध्ये बसवून घरी आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT