Covid-19 Alert
Covid-19 AlertDainik Gomantak

Covid-19 Alert: मुंबईत कोविड सेंटर 'स्टँडबाय मोड' वर

चीनमध्ये कोरोना विषाणुने पुन्हा एकदा वेग घेतला असून महाराष्ट्र सतर्क झाला आहे.
Published on

देशात कोरोना विषाणुचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत चालला होता. परंतु चीनमध्ये कोरोना विषाणुचा पुन्हा एकदा वाढता वेग पाहून महाराष्ट्र सतर्क झाला आहे. तसेच आयआयटी कानपूरच्या कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. (Covid-19 Updates News )

मुंबई (Mumbai) महापालिकेचं म्हणणे आहे, शहरामध्ये बांधण्यात आलेले एकही कोविड सेंटर बंद झालेले नाही. टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी यासंदर्भात सतत चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत शहरातील जम्बो कोविड सेंटर बंद करायचे की ते चालू ठेवायचे, यावर टास्क फोर्स विचार करेल आणि त्याचा त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Covid-19 Alert
महाराष्ट्रातील परभणीत देशातील सर्वाधिक पेट्रोलचा दर

मुंबईमधील जंबो कोविड सेंटर्स ‘स्टँडबाय मोड’वर:

मुंबई शहरातील कोरोना विषाणू (Corona) विरुद्धच्या लढाईत जंबो कोविड सेंटरचे मोठे योगदान आहे. मुंबईत या विषाणूची प्रकरणे कमी झाली आहे, पण अद्यापही चौथ्या लाटेची भीती नाकारता येत नाही. म्हणून मुंबई शहरात सध्या 9 पैकी 3 जंबो कोविड सेंटर चालू ठेवले आहेत. उर्वरित 6 जम्बो सेंटर्स ‘स्टँडबाय मोड’वर ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com