Eknath Shinde group in Guwahati Dainik Gomantak
महाराष्ट्र

रुग्णालयातून परताच राज्यपाल अ‍ॅक्शन मोडमध्ये; थेट पोलिस आयुक्तांना लिहिले पत्र

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे गटाच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे डीजीपी यांना पत्र लिहिले आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Governor Lettter To DGP: राजकीय संकटाच्या काळात महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका निर्माण केला होता. आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे डीजीपी यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे. सर्व आमदारांना (शिंदे कॅम्पमधील) सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. याशिवाय आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय गोंधळामुळे बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक सातत्याने निदर्शने करत आहेत. अनेक आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या पोस्टरवरही काळ फासलं जात आहे, तर काही ठिकाणी कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र सरकारकडे स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची मागणी केली होती.

केंद्र सरकारनेही दिली सुरक्षा

याप्रकरणी महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहिण्यापूर्वी केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला होता. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व आमदारांच्या घरी सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. या आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

जिवाला धोका असल्याचे शिंदे गटाने सांगितले होते

बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रात स्वतःवर हल्ला होण्याची भिती व्यक्त केली होती. लोक सध्या नाराज आहेत, त्यामुळे तिथे जाणे योग्य नाही. आम्ही आता जाऊ शकत नाही, आता महाराष्ट्रात येणे सुरक्षित वाटत नाही, असे काल केसरकर यांनी माध्यमांना सांगितले होते.

गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदार

सुमारे आठवडाभरापासून महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे अनेक आमदारांसह गुवाहाटी, आसाममध्ये मुक्काम ठोकून महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करत आहेत. त्यांच्यासोबत जवळपास 50 आमदार उपस्थित असून यातील बहुतांश शिवसेनेचे आहेत. आणि काही अपक्ष आमदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

CM Pramod Sawant: ‘कशे आसात दोतोर?’ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळीत गर्दी; आरोग्याची केली विचारपूस

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT