Ganpatipule Beach Dainik Gomantak
महाराष्ट्र

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; गणपतीपुळे बीच अनलॉक

मात्र आता मंगळवारी गणपतीपुळ्याचा किनारा (Ganpatipule Beach) ग्रामपंचायतीकडून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे कोरोना निर्बंधामध्ये काही शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारकडून (State Government) घेण्यात आला आहे. यातच आता जीवरक्षक नसल्या कारणाने पर्यटकांसाठी गणपतीपुळ्याचा (Ganpatipule) किनारा पर्यटकांना खुला नव्हता मात्र आता मंगळवारी गणपतीपुळ्याचा किनारा ग्रामपंचायतीकडून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांची रेलचेल गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर पाहायला मिळणार आहे.

कोरोना निर्बंध आणि सलग सुट्ट्या आल्यामुळे गणपतीपुळ्याला पर्यटकांचा राबता वाढलेला दिसला होता. अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर मनमुराद आनंद लुटताना दिसले. मात्र किनाऱ्यावर जीवरक्षक नसल्याकारणाने गणपतीपुळे पोलिसांकडून पर्यटकांना किनाऱ्यापर्यंत येण्यास मज्जाव केला होता. त्याचबरोबर गणपतीपुळे ग्रामपंचायतीला सुरक्षेसाठी काही उपाययोजना करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या. जोपर्यंत गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक किनाऱ्यावर नियुक्त होत नाहीत तोपर्यंत किनाऱ्यावर पर्यटकांना मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी होती.

दरम्यान, मंगळवारी रात्री पर्यटकांसाठी गणपतीपुळ्याचा किनारा खुला करुन देण्यात आला. आता किनाऱ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा मज्जाव असणार नाही. त्याचबरोबर देवस्थानाच्या परिसरामध्ये लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटावण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवारीही अनेक पर्यंटक समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसून आले. त्याचबरोबर काही पर्यटकांनी समुद्रस्नानाचाही मनमुराद असा आनंद लुटला. कोणत्याच प्रकारचा रोख नसल्याने पर्यटकांची संख्या चांगलीच पाहायला मिळाली. त्यासह किनारा हा फेरीवाल्यांसाठीही खुला करण्यात आल्याने त्यांच्यामध्येही आनंदाचे वातावरण आहे.

शिवाय, राज्य शासनाच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन फिरण्यासाठी किनारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर सुरक्षारक्षकांना हजर राहण्याचे पत्र देखील देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Migration: 5 वर्षांत 'इतक्या' गोमंतकीयांकडून भारतीय नागरिकत्‍वाचा त्‍याग; 99 % लोकांनी निवडले 'पोर्तुगाल'

Gautam Gambhir: "टीका करा, मी पर्वा करत नाही"! सोशल मीडिया ट्रोलिंगवरून गंभीरचे रोखठोक मत; बांधिलकी संघाशी असल्याचे प्रतिपादन

Amit Patkar: वाढदिनी पाटकर धरणे आंदोलनात! मिराबागवासीयांना दिला पाठिंबा; राज्य सरकारवर केली टीका

Mirabag: '..आमचा संगमेश्वर कायमचाच पाण्याखाली जाईल'! मीराबाग बंधाऱ्याला सांगेवासीयांचाही विरोध; सरकारला दिला इशारा

Suryakumar Yadav Retirement: 'रिटायर होणार का'? कॅप्टन सूर्याने दिले पहिल्यांदाच उत्तर; हसत हसत म्हणाला की....

SCROLL FOR NEXT