अफगाणिस्तानच्या (Afghanistan) विद्यार्थ्यांचे (students) व्हिसा आणि शरणार्थी यांच्या काही मागण्या होत्या त्या आम्ही ऐकून घेतल्या आहेत. त्यांच्या मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे पाठवू, अफगाणिस्तान मधील मुलांना महाराष्ट्रात कोणाताही त्रास होणार नाही (Children will not be harmed in Maharashtra) याची खात्री राज्याचे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी राज्यातील अफगाण विद्यार्थ्यांना दिली आहे.
अफगाण विद्यार्थी मोहम्मद म्हणाला, आम्ही 5 हजार मुले शिकत आहोत. आफगाणिस्तानमध्ये जे काही घडले आणि सध्या घडते आहे ते दुर्देवी आहे. मुले अभ्यास करुन परत गेले त्यांचा जीव आता धोक्यात आहे. कारण तेथे वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंनी आमच्या मागण्या पुढे सांगण्याचे आश्वासन दिले आहे. भारतात राहणाऱ्या मुलांकडे पैसे नाहीत, आम्हाला मदत हवी आहे. आमचे व्हिसा देखील संपले आहेत. आम्ही शरण आलो आहोत, यात काही अडचण येऊ नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.